शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांचे 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
2
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
3
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
4
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
5
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
6
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."
7
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
8
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
9
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
10
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
11
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
12
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
13
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
15
फ्लॅट वेळेत न दिल्यास बिल्डरला १८% व्याजासह भरपाई द्यावीच लागेल; सुप्रीम कोर्टाचा आदेश
16
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
17
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
18
देशातील प्रत्येक तिसरा लहानगा हार्ट अटॅकच्या मार्गावर?; मुलांच्या रक्तातील चरबीचे प्रमाण वाढले
19
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
20
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक

मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट जगात सर्वश्रेष्ठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 00:33 IST

नेसरी : मराठा लाईट इन्फंट्री भारतीय लष्करातील नावाजलेली रेजिमेंट असून, जगाच्या इतिहासात नंबर वनची सर्वश्रेष्ठ रेजिमेंट असल्याचे प्रतिपादन निवृत्त लेफ्टनंट कर्नल पद्मनाभ अनंतराव पंडितराव यांनी केले.नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे शहीद मेजर सत्यजित अजितसिंह शिंदे-नेसरीकर यांच्या १३ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी अजितसिंह शिंदे-नेसरीकर, संयोगीतादेवी शिंदे-नेसरीकर, ...

नेसरी : मराठा लाईट इन्फंट्री भारतीय लष्करातील नावाजलेली रेजिमेंट असून, जगाच्या इतिहासात नंबर वनची सर्वश्रेष्ठ रेजिमेंट असल्याचे प्रतिपादन निवृत्त लेफ्टनंट कर्नल पद्मनाभ अनंतराव पंडितराव यांनी केले.नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे शहीद मेजर सत्यजित अजितसिंह शिंदे-नेसरीकर यांच्या १३ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी अजितसिंह शिंदे-नेसरीकर, संयोगीतादेवी शिंदे-नेसरीकर, संग्रामसिंह शिंदे, डॉ. राणोजी शिंदे, संजयसिंह शिंदे, आदी नेसरीकर कुटुंबीयांची प्रमुख उपस्थिती होती.कर्नल पंडितराव म्हणाले, सत्यजित शिंदे हे धाडसी व्यक्तिमत्त्व होते. घरात सुख मिळत असतानादेखील देशसेवेसाठी स्वत:ला वाहून घेऊन देशाच्या कामी आले. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी व त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन नेसरी भागातील जास्तीत जास्त तरुणांनी सैन्यात भरती व्हावे.ट्रेनिंग व मार्गदर्शनासाठी कधीही बोलवा एकही रुपये मानधन न घेता मार्गदर्शन करीत राहू, असे स्पष्ट केले.शहीद मेजर सत्यजित शिंदे समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. संदीप फगरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शशीकला पाटील, गोडसाखरचे माजी संचालक बाबूराव गुरबे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन सरपंच आशिषकुमार साखरे, तर मेजर सत्यजित शिंदे यांच्या पुतळ्याचे पूजन कर्नल पद्मनाम पंडितराव यांच्या हस्ते झाले.यावेळी गिरीजादेवी शिंदे-नेसरीकर, उपसरपंच रौप मुजावर, आशादेवी तेली, महादेव साखरे, प्रकाशराव दळवी, शिवाजीराव हिडदुगी, वसंतराव पाटील, हरिभाऊ भालेकर, के. अ‍े. शिंत्रे, डोणेवाडीचे सरपंच उत्तम नाईक, तारेवाडीच्या मालुताई भारती, तळेवाडीच्या सरपंच श्वेताताई वसंत देसाई, सावतवाडीच्या सरपंच नंदाताई नांदवडेकर, दयानंद नाईक, गोपाळराव पाटील, शिवाजीराव पाटील, विलासराव हिडदुगी, गोपाळ परीट, आदी उपस्थित होते.समितीचे उपाध्यक्ष प्रकाश कोरी यांनी सूत्रसंचालन केले. शशिकांत हुक्केरी यांनी आभार मानले.